अपरांत हॉस्पिटल मध्ये डॉ.मर्झिया अस्लम बिजले यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून नियुक्ती : Paediatric Neuro-Rehabilitation व Developmental Rehabilitation मध्ये विशेष प्राविण्य


चिपळूण : फिजिओथेरपी आणि पुनर्वसन उपचार क्षेत्रातील आधुनिक, शास्त्रीय व रुग्णकेंद्रित सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे डॉ. मर्झिया अस्लम बिजले, BPT, MPT यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.मर्झिया अस्लम बिजले यांनी कृष्णा विश्व विद्यापीठातून Paediatric Neurosciences मध्ये Master’s Degree प्राप्त केली आहे. त्यांना विशेषतः Paediatric Neuro-Rehabilitation, Developmental Rehabilitation आणि Evidence-Based Physiotherapy यामध्ये विशेष रुची व प्रशिक्षण आहे.
आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत त्या Rank Holder राहिल्या असून फिजिओथेरपी क्षेत्रातील संशोधन, शैक्षणिक सादरीकरणे आणि विविध व्यावसायिक परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
बालरुग्णांच्या पुनर्वसनासोबतच डॉ.मर्झिया यांना Adult Neurological आणि Musculoskeletal Cases हाताळण्याचा अनुभव आहे. रुग्णाची वैयक्तिक गरज, कार्यक्षमता आणि दैनंदिन जीवनातील स्वावलंबन लक्षात घेऊन उपचार नियोजन करण्यावर त्यांचा विशेष भर आहे.
🧠 न्यूरोलॉजिकल रिहॅबिलिटेशन
👶 बालकांचे Developmental Rehabilitation
💪 Adult Neurological Rehabilitation
🦴 Musculoskeletal Physiotherapy
🎯 Functional Rehabilitation
🔬 Evidence-Based Physiotherapy
या सेवेमुळे विशेषतः न्यूरोलॉजिकल समस्या असलेली मुले, विकासात्मक विलंब असलेली बालके तसेच न्यूरोलॉजिकल आणि मस्क्युलोस्केलेटल समस्या असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी आधुनिक पुनर्वसन उपचारांची सुविधा अधिक व्यापक होणार आहे.
रुग्णाला केवळ उपचार देणे नव्हे, तर त्याला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि स्वावलंबी बनविणे, हा डॉ. मार्झिया यांच्या उपचारपद्धतीचा केंद्रबिंदू आहे.
अपरांत हॉस्पिटलच्या विस्तारित फिजिओथेरपी व रिहॅबिलिटेशन सेवेमध्ये त्यांच्या नियुक्तीमुळे चिपळूण व परिसरातील रुग्णांना विशेष प्रशिक्षण व आधुनिक दृष्टिकोन असलेल्या फिजिओथेरपी सेवांचा लाभ मिळणार आहे.




