कामाच्या ठिकाणी महिला लैंगिक शोषण प्रतिबंधाबाबत उदबोधन वर्ग संपन्न

मार्गताम्हाणे : वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय, मार्गताम्हाणे येथे आज महिला तक्रार निवारण समिती (POSH) अंतर्गत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध, प्रतिबंधात्मक उपाययोजना व तक्रार निवारण प्रक्रिया याबाबत उद्बोधन वर्ग आयोजित करण्यात आला.
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संरक्षण अधिकारी,तसेच या संदर्भात लोकमत मधील आपल्या लेखनाद्वारे जनजागृतीचे मोलाचे काम त्यांनी केलेले आहे अशा श्रीमती माधवी जाधव मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत श्री नंदादीप इंदुलकर व श्रीमती प्रज्ञा राणे मॅडम उपस्थित होते. मार्गदर्शनातून कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व भयमुक्त वातावरण मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, महिला तक्रार निवारण समितीची भूमिका तसेच POSH कायद्याच्या अनुषंगाने असलेल्या तरतुदी याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा सौ. दळवी मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. लकेश्री सर, पर्यवेक्षक श्री. पवार सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षितता, सन्मान आणि कार्यस्थळी सकारात्मक वातावरण याबाबत जनजागृती झाली.
— वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय, मार्गताम्हाणे




