Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते रफीक मोडक यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर यांची उपस्थिती

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व वक्ता सेल जिल्हा अध्यक्ष श्री रफिक मोडक यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्ताने सावर्डे येथील प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 1 तसेच दोन्ही उर्दू शाळा व बालवाडी मधील मुलांना विद्यार्थ्यांना वह्या,पेन, पेन्सिल, रंगपेटी,कंपास पेटी,स्केच पेन तसेच बालवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तक्ते अशा स्वरूपात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले‌. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला .आपल्या मनोगता मध्ये म्हटले की त्यांच्या पस्तीस वर्षाच्या शिक्षका च्या कारकिर्दीमध्ये विद्यार्थी पालक यांचे मधील असणारा सामाजिक बांधिलकीची जपवणूक निवृत्ती झाल्यानंतरही करता यावी तसेच आपल्या भागातील प्राथमिक शाळांच्या स्थिती जाणून घेऊन लोकांपर्यंत प्राथमिक शाळेच्या समस्या पोचवून पालक,विद्यार्थी,समाज व आपण यामधील नात्याची जपवणूक भविष्यात कायम सुरू रहावी हाच उद्देश आहे या कार्यक्रमासाठी सावर्डे गणातील पंचायत समितीचे सदस्य शौकत भाई माखजनकर, ज्येष्ठ नागरिक शिराज भाई सय्यद उस्मान भाई मागजणकर,शकीला जावेद, समीना कापडी, अजमीना कल्पे ,ग्रामपंचायत सदस्य समिया मोडक ,लायक मोडक, जैद मोडक उपस्थित होते तसेच मराठी शाळेचे मुख्याध्यापक रुपेश महाडिक,पोकळे सर,पिंपळ मोहिल्यातील उर्दू शाळेचे शिक्षक शेख सर,दळवी मॅडम बालवाडीच्या शिक्षिकाअजमीना खलपे आणि भुवड मॅडम अड्रेकर मोहल्ला उर्दू शाळेच्या शिक्षिका उमेरा पठाण,अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले शेवटी रफिक मोडक यांनी सर्वांचे आभार मानले.

Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!