Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिवेली उर्दू येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

जि. परिषद प्राथमिक शाळा चिवेली उर्दू येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इ. ६वी व ७वी मधून कुमारी खदीजा चौगले, आईमा शेख, मुस्कान घोरे, सहारा महालदार व सलाम खान हे विद्यार्थी शिक्षक म्हणून काम करत होते. संपूर्ण दिवस शाळेमध्ये एक वेगळे वातावरण होते. त्याच प्रसंगी एक छोटासा कार्यक्रम ही घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी आमिना परकार तिच्या कुरआन पठणाने करण्यात आली. तदनंतर शिक्षक श्री मुजाहिद मेयार यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी व्यवस्थापन समिती सदस्य व गाव जमात सचिव जनाब इमदाद चौगले हे नुकतेच पवित्र उमराह यात्रेवरून परतल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर लहान इयत्तेतील विद्यार्थ्यांतर्फे इंग्रजी, उर्दू मध्ये भाषणे झाली. लहान इयत्तेतील मुलांनी सुविचार व शायरी सादर केली. शाळा व्यवस्थापन समिती तर्फे शाळेतील मुख्याध्यापक श्री हसन अलि हुसैन अलि खान सर, श्री मुजाहिद मेयर सर, सौ. परवीन गडकरी मॅडम व सौ. आयशा परवीन महालदार मॅडम यांचे बुके, शॉल व सन्मानचिन्ह देऊन आदर सत्कार करण्यात आला.
यावेळी एक दिवसाचे बनलेले शिक्षक वर्गातर्फे कु. सहारा महालदार, कु. सलाम खान, कु. खदीजा चौगले, कु. मुस्कान घारे व कु. आईमा शेख यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी आईमा शेख व सहारा महालदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांतर्फे व्यवस्थापन समिती सदस्य जनाब इमदाद चौगले यांनी मुलांनी चांगला कार्यक्रम सादर केल्याचे संपूर्ण श्रेय त्यांनी शिक्षक वर्गाला देत त्यांची भरपूर प्रशंसा केली. जनाब जहीर चौगले व मुख्याध्यापक ताज खान सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापन समिती अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष जनाब मुजफ्फर दिवेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ०५ सप्टेंबरचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

चहा नाश्ता व सरबत जनाब मुसकीम महालदार, सौ. शकीला शेख व अफिक मौलाना जहीर चौगले यांच्यातर्फे तर दुपारी जेवणाची व्यवस्था सौ. वजिरा गफ्फार महालदार यांच्यातर्फे करण्यात आल्यामुळे वरील सर्व व्यक्तींचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट रित्या विद्यार्थिनी कु. खदीजा चौगले हिने केले. शेवटी विद्यार्थिनी कु. मुस्कान घारे तिच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!