तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा अपंग पुनर्वसन संस्थेकडून ट्राॅफी व प्रमाण पत्र देऊन सन्मान

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेतील विद्यार्थ्यांना गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे ट्राॅफी व आकर्षक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये करण्यात आलेल्या आवाहना प्रमाणे या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भरघोस निधी संकलन करून संस्थेस सहकार्य केल्याबद्दल संस्थेकडून देण्यात आलेली ट्रॉफी, आकर्षक प्रमाणपत्र व पेन याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर, जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर,श्री.देवरुखकर सर, श्री.केळस्कर सर, श्री.कुळे सर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी समाजातील सर्व घटकातुन निधी संकलन करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. संकलित निधी संस्थेकडे सुपुर्द केला होता. त्यामध्ये विशेष निधी संकलन करणा- या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. पडवळकर संस्कार शैलेंद्र इ. 8 वी, साळवी स्वरा प्रविण इ. 6 वी,पारदळे अनन्या शैलेंद्र इ. 5 वी, टेरवकर दुर्वा विवेक इ, 5 वी, कारकर हार्दिक जगदिश इ. 5 वी, कळंबाटे सौरभ जनार्दन इ. 6 वी, पडवेकर आयुष्य संजय इ. 6 वी, डाफळे स्नेहल संतोष इ. 7 वी, आदवडे मनस्वी मधुकर इ. 8 वी, भुवड हर्षदा संजय इ. 8 वी, साळवी मुकेश महेश इ. 8 वी या विद्यार्थ्यांनी विशेष निधी संकलन केले. त्यांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे पाटपन्हाळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. प्रकाश बापट सर,गुहागर हायस्कूलचे श्री.जाधव सर व भरत कदम सर यांनी प्रत्यक्ष प्रशेलेस भेट देऊन या वस्तू सुपुर्द केल्या व शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्येही आपल्या प्रशालेकडून विशेष निधी संकलन करावे असे आवाहन केले.तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर यांना ट्राॅफी, सन्मान पत्र व पेन देऊन सन्मानित केले.यावेळी गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे प्रशालेतर्फे आभार मानण्यात आले.या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन श्री. कुळे सर यांनी केले तर आभार श्री.देवरुखकर सर यांनी केले.




