गुड शेफर्ड चा शिक्षक दिन महेश बेक्वेट्स, सेक्टर १५ बेलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा










गुड शेफर्ड चा शिक्षक दिन महेश बँक्वेट्स , सेक्टर 15 .बेलापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाला दी असोसिएशन फॉर सीनियर सिटीजन मँगो गार्डन सीबीडी बेलापूरच्या ज्येष्ठ नागरिकांनीही उपस्थिती दर्शवली . गुड शेफर्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. लता प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला . कार्यक्रमाची सुरुवात सौ . लता प्रकाश पवार, जेष्ठ नागरिक संघटनेचे श्री .मच्छिंद्र मते, श्री. आर. के. मोदी, श्री अजय माहेरा, श्री . विलास बर्वे,तसेच सौ .मंजीत कौर झुटी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. शिक्षकाने केलेले नृत्याविष्कार व नाट्य तसेच ज्येष्ठ नागरिक सदस्यांनी केलेले गीत गायन यामुळे कार्यक्रमाला फारच रंगत आली .सर्वांनी मिळून या ठिकाणी जल्लोष साजरा केला . यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या शिक्षकांना पैसे तसेच भेटवस्तू बक्षीस रूपाने देण्यात आले .त्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला. सर्वांनी वंदे मातरम गायन करून कार्यक्रमाची समाप्तता झाली.




