Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना चिपळूण महसूल विभागातील मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के रंगेहाथ सापडले : एकच खळबळ

*चिपळूण :* चिपळूण तालुक्यातील महसूल विभागातील मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याला सातबारा फेरफाराच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी वरील मंडळ अधिकाऱ्याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर संबंधित पथकाने सापळा रचला.

चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना संबंधित मंडळ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महसूल विभागातील या मंडळ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईची जिल्हाभरात चर्चा सुरू असून, या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!