कोकणचे सुपुत्र, प्रसिद्ध गीतकार-संगीतकार शशांक कोंडविलकर यांच्या शब्द-संगीतातून साकारला ‘जन्माचा सोहळा’


प्रतिनिधी (मंगेश जाधव )
कोकणातील सुपुत्र तथा प्रसिद्ध गीतकार-संगीतकार शशांक कोंडविलकर यांच्या शब्द आणि संगीताने सजलेले ‘जन्माचा सोहळा’ हे भावस्पर्शी गीत नुकतेच साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांच्या ‘सप्तसूर म्युझिक’ युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक डोहाळे जेवण सोहळ्याची संस्कृती, होणाऱ्या आईच्या भावना आणि नव्या जीवाच्या आगमनाचा आनंद या गीतातून अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे.
या गीताची संकल्पना (Concept) साईनाथ राजाध्यक्ष आणि नीरव म्हात्रे (MH43 OFFICIAL) यांनी विकसित केली असून, पारंपरिक डोहाळे जेवण सोहळ्याला आधुनिक संगीत आणि भावनिक मांडणीची सुंदर जोड देण्यामागे त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
शशांक कोंडविलकर यांच्या शब्दांना आणि संगीताला या संकल्पनेमुळे अधिक प्रभावी रूप मिळाले आहे.
या गीताला स्नेहा महाडिक आणि हर्ष पालकर यांच्या सुरेल आवाजाची साथ लाभली असून, संगीत निर्मिती, संयोजन आणि प्रोग्रामिंग ओंकार तोटकेकर (Audiopalace Production) यांनी केले आहे.
गीताच्या व्हिडिओचे दिग्दर्शन पराग सावंत यांनी केले असून, मातृत्व, कुटुंबातील जिव्हाळा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन या गीतातून घडते.
आईपणाचा आनंद, प्रेम, संस्कृती आणि नव्या जीवाच्या आगमनाचा उत्सव साजरा करणारे ‘जन्माचा सोहळा’ हे गीत सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
हे गीत जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावे, आवडल्यास आपल्या आप्तेष्टांसोबत शेअर करावे आणि नव्या कलाकृतीला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सप्तसूर म्युझिककडून करण्यात आले आहे.




