वेळंब ग्रामपंचायती मध्ये महापुरुषांचा अवमान ! शासनाचा जीआर धाब्यावर : उपसरपंचाचा उपोषणाचा थेट इशारा!

प्रतिनिधी (मंगेश जाधव)-गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायत मध्ये गेल्या तीन वर्षापासून महापुरुषांचे फोटो लावले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शासनाचा स्पष्ट जीआर असताना देखील ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप उपसरपंच श्रीकांत सखाराम मोरे यांनी केला आहे. यासंदर्भात तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नांदलस्कर यांनी दोन वर्षांपूर्वीच ग्रामसभेत सूचना देऊनही प्रशासनाने कोणती दखल घेतली नाही हा थेट महापुरुषांचा अपमान असल्याचे मोरे यांनी आपल्या निवेदन म्हटले आहे दिनांक 13/10/2026 रोजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात मोरे यांनी इशारा दिला आहे की पुढील आठ दिवसात जीआर प्रमाणे महापुरुषांचे फोटो लावावेत अन्यथा मी वेळंब ग्रामपंचायतच्या समोर
उपोषणाला बसेन असा थेट इशारा मोरे यांनी दिला आहे. या निवेदनाची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी साक्षर केली आहे आता ग्रामपंचायत प्रशासन आठ दिवसात फोटो लावणार की उपोषण होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




