चिपळूण शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सलीमभाई पालोजी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
सर्व स्तरातून अभिष्टचिंतन करण्यासाठी एकच गर्दी

===================
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चिपळूण शहराचे उपाध्यक्ष सलीम भाई पालोजी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व शहरातील मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सलीम भाई पालोजी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक योगेश पवार आणि नगरसेविका शहनाझभाबी वांगडे चिपळूण शहर अध्यक्ष मिलिंदजी कापडी, कार्याध्यक्ष उदय ओतारी आणि सचिव मनोज जाधव, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक समीरजी जाणवलकर, जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन साडविलकर, युवक अध्यक्ष अनिकेत ओतारी आणि अक्षय कुडालकर ,महिला शहर अध्यक्षा अदितीताई आणि उपाध्यक्षा अपूर्वा अहिरे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही शुभेच्छा दिल्या दिवसभरात शहरातील विविध स्तरातील नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी सलीम भाई पालोजी यांना प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून तसेच सोशल मीडिया द्वारे दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सलीम भाई पालोजी यांनी सर्व मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.




