Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

आदिवासी विद्यार्थिनी बनल्या शिक्षिका; शिक्षक दिनी अनोख्या उपक्रमातून अध्यापनाचा अनुभव

(जकरिया कालसेकर): एस. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मोरबा येथे शिक्षक दिनानिमित्त अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या इतिहासात प्रथमच इयत्ता दहावी ‘क’ मधील तीन आदिवासी विद्यार्थिनींनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षिकेची भूमिका साकारत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. या उपक्रमातून विद्यार्थिनींना अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

या उपक्रमात गीता संभा कोळी, अंकिता रामदास वाघमारे आणि शर्मिला संतोष पवार या तीन विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी विविध विषयांचे अध्यापन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकाची भूमिका पार पाडताना त्यांनी दाखविलेला आत्मविश्वास, शिस्त आणि उत्साह विशेष कौतुकास्पद ठरला.

या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना शाळेचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आसफ पल्लवकर सर, चेअरमन अब्दुल कादिर हरणेकर सर, प्रिन्सिपल खान सर, सुपरवायझर चितले सर तसेच को कॅरीकोलम ॲक्टिव्हिटीचे प्रेसिडेंट नवगणे सर यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.

आदिवासी समाजातील विद्यार्थिनींनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन अध्यापनाची जबाबदारी स्वीकारणे ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या उल्लेखनीय उपक्रमातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. भविष्यात या तिन्ही विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी, यासाठी शाळेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या उपक्रमामुळे ‘विद्यार्थ्यांमधील शिक्षक’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली असून, आदिवासी विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासाला नवी दिशा मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!