Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

अझोला उत्पादन प्रात्यक्षिकाला साखळोलीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


(दापोली- प्रतिनिधी:सागर गोवळे)
​शिवाजी नगर, साखळोली:
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा (RAWE) अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली कृषी महाविद्यालयातील ‘संजीवनी गटा’च्या विद्यार्थिनींनी साखळोली येथे शेतकऱ्यांसाठी अझोला उत्पादन प्रात्यक्षिकाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
​स्थानिक शेतकरी श्री. अनिकेत पाडवेकर यांच्या गोठ्याजवळ अझोला उत्पादनासाठी ६×३×१ फूट आकाराचा तलाव तयार करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तलावात ताडपत्री अंथरून गळती रोखण्यासाठी कडा मातीने बंद करण्यात आल्या. त्यानंतर स्वच्छ पाणी, शेण, माती आणि एसएसपी (SSP) चे मिश्रण तयार करून ते स्थिर झाल्यावर अझोला कल्चर सोडण्यात आले.
​अझोला लागवडीचे प्रमुख फायदे व वैशिष्ट्ये:
​पोषक पूरक खाद्य: अझोला प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असून गायी-म्हशींसाठी अत्यंत पौष्टिक आहे.
​खर्चात बचत: यामुळे व्यावसायिक पशुखाद्यावरील खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलका होतो.
​द्विविध वापर: पूरक चाऱ्यासोबतच अझोलाचा उत्कृष्ट ‘जैवखत’ (Bio-fertilizer) म्हणूनही वापर करता येतो.
​ताजा चारा: गोठ्याजवळच तलाव असल्याने शेतकऱ्यांना रोज ताजा व अल्पदरातील चारा सहज उपलब्ध होईल.
​या प्रात्यक्षिकादरम्यान १३ ग्रामस्थांना तलावातील पाणी व्यवस्थापन आणि अझोला कापणीच्या योग्य पद्धतींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
​सदर प्रात्यक्षिकाचे आयोजन संजीवनी गटाच्या विद्यार्थिनी कृतिका ठाकरे, श्रावणी गिम्हवणेकर, कुंजल कांबळे, कृतिका खोडका, वैष्णवी अहिरे, अंजली देवकाते, सानिया खोत, स्वालिहा मुकादम, तेजोन्मयी बलवान व अक्षता कालप यांनी केले.
​या उपक्रमाला सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!