Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेनेने गुहागर तालुका महिला सेनेच्या वतीने चिखली गावदेवी मंदिर परिसरात श्रावण मास स्वच्छता अभियान संपन्न

*अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेनेने गुहागर तालुका महिला सेनेच्या वतीने चिखली गावदेवी

गुहागर तालुक्याचे सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
श्रावण महिन्याचे पवित्र दिवस सुरू असून, या निमित्ताने संपूर्ण देशभरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आणि गुहागर तालुका महिला सेनेच्या अंतर्गत, गुहागर तालुक्यातील चिखली येथील गावदेवी मंदिर परिसरात आज भव्य ‘श्रावण मास स्वच्छता अभियान’ अत्यंत उत्साहात पार पडले.रामानंद संप्रदायाच्या वतीने सध्या संपूर्ण भारतभर हा स्वच्छता उपक्रम राबवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून गुहागर तालुक्यातील महिला सेनेने एकत्र येत चिखली येथील मंदिर आणि त्याचा संपूर्ण परिसर स्वच्छ आणि चकाचक केला.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी गुहागर तालुक्याचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना सभापती प्रणव पोळेकर यांनी रामानंद संप्रदायाच्या सर्व अनुयायांचे आणि महिला भगिनींचे मनापासून आभार मानले. संप्रदायाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, “भविष्यात संस्थानाला किंवा या कार्यात कोणतीही मदत लागल्यास निसंकोचपणे आमच्याकडे या, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहू,” अशी ग्वाही देखील त्यांनी या प्रसंगी दिली.
या स्वच्छता मोहिमेमध्ये रामानंद संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष दीपक तावडे,पीठ ब्रिगेडियर विकास घनश्याम मांजरेकर,महिला अध्यक्षा वैभवी हळदणकर,,गुहागर तालुका अध्यक्ष धनश्री मांजरेकर, गुहागर महिला अध्यक्ष संज्योति तेरेकर,राजापूर महिला अध्यक्ष उषा भोसले,सुशांत धामणस्कर त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील तब्बल १२० महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. महिलांच्या या ऐतिहासिक सहभागामुळे आणि सेवाभावामुळे चिखली परिसरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!