Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

वहाळमधील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Oplus_16908288
चिपळूण :-* ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या संकल्पनेतून रोटरी क्लब चिपळूण व प्राथमिक आरोग्य केंद्र, वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर वहाळमध्ये उत्साहात संपन्न झाले. शिबिराला २१५ रुग्णांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या आरोग्य शिबिराला जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष सुंदरजी टाकळे, जि.प. सदस्य संजयजी कदम, वैद्यकीय अधिकारी पांडे मॅडम, यादव मॅडम ,निशिकांत मोहोड ,जन आरोग्य समिती सदस्य मंगेश शेलार, भरत बल्लाळ, भारती लाड, महेंद्र बारगुडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये रुग्णांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक समस्यांबाबत तज्ज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेला मोठा प्रतिसाद उत्साहवर्धक ठरला.
आरोग्य तपासणीसोबतच रुग्णांना विविध आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्यविषयक सवयी आणि आवश्यक काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्य तपासणीबाबत जनजागृती होण्यासोबतच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!