महाराष्ट्र

वैदेही सावंत यांचा स्नेहबंध बहुउद्देशीय फौंडेशनतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार


मध्यविभाग फेपडेवाडी, मानसकोंड, संगमेश्वर, दि. १६ सप्टेंबर २०२६ :
स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशनच्या लोगोचे अनावरण व वस्त्रदान समर्पण सोहळ्यात
चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.वैदेही सुधीर सावंत यांचा यथोचित सत्कार केला आहे.

त्यांनी सर्वानी एकत्र राहावं व शिव्या कोणी देऊ नये असा समाजात परिवर्तानीय संदेश देत असतानाच यापूर्वी 29 मार्च 2023 रोजी श्रीराम जन्मोत्सव या कार्यक्रमाला फेफडेवाडीत विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी येऊन उत्तम मार्गदर्शन केले व सर्व महिलाना प्रतिज्ञा दिली. त्यानंतर मानसकोंड फेपडे वाडीत विधवा सधवा भेदभाव संपुष्टात येण्यास मोलाची मदत झाली.
यशदाव एन. आय.आर.डी. या शासनाच्या नामांकित संस्थेच्या स्टेट मास्टर ट्रेनर असूनही विनामोबदला फेफडेवाडीत सातत्याने येऊन मार्गदर्शन करतात.विधवा व एकल महिलांच्या समस्या निवारणासाठी काम करतात.

समाजातील अनिष्ट रूढी परंपरा सोडून नव्या परिवर्तशील वैचारिक विचारांचे समर्थन करून ते अमलात येण्यासाठी कृतीशील कार्यक्रम करतात. पर्यावरण रक्षणासाठी काम करतात.

एक पाऊल सकारात्मक परिवर्तनाकडे या त्यांच्या स्लोगन प्रमाणे त्या कोणतंही पद, निधी, राजकीय पाठिंबा नसताना समाजासाठी अहोरात्र कार्य करत आहेत
या सामाजिक कार्याचा विचार करून स्नेहबंध संस्थेने त्यांना सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
.
या कार्यक्रमास माहेर संस्थेचे अधीक्षक श्री. सुनिल कांबळे साहेब,लायन्स क्लब संगमेश्वरचे अध्यक्ष श्री. रविकांत शिंदे, उपाध्यक्ष श्री. मनीष चोचे यांच्यासह श्री. गजानन पाटील,दीपिका कदम, श्रीराम हनुमान ग्रामस्थ मंडळाचे वाडी प्रमुख श्री. गणपत फेपडे, श्री. गणुजी फेपडे ,अनिता बडद तसेच स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक श्री. विलास कानर गुरुजी यांनी केले.

अध्यक्ष श्री हरिचंद्र फेपडे,, सह सचिव श्री विश्वनाथ फेपडे व खजिनदार श्री रवींद्र फेपडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!