फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर संस्थेची नवी मुंबईत शाखा स्थापन- चंद्रकांत दादा जगताप यांची अध्यक्षस्थानी निवड

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोर या संस्थेच्या वतीने गेल्या १६ वर्षांपासून आंबेडकरी चळवळीचे विचार देश-विदेशात पोहोचविण्याचे तसेच साहित्य संमेलने, परिसंवाद, चर्चा सत्रे आणि विविध वैचारिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहे.
याच कार्याचा विस्तार करत संस्थेची नवी मुंबई शाखा कॅफे विहार, वाशी येथे नुकतीच स्थापन करण्यात आली. आंबेडकरी विचार, सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनवादी चळवळीला अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने शाखेची स्थापना करण्यात आली आहे.
शाखा स्थापनेच्या प्रसंगी उपस्थितांच्या सर्वानुमते नवी मुंबई शाखेच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवी मुंबई शाखेच्या अध्यक्ष स्थानी चंद्रकांत दादा जगताप, उपाध्यक्ष संजय खरात, कार्याध्यक्ष भगवान सुरलके, तुषार नेवरेकर, सचिव विलास पवार, चंद्रकांत काकडे, सहसचिव संदेश उघाडे, राजेंद्र बनसोडे, कोषाध्यक्ष अनघा जाधव, सहकोषाध्यक्ष आदेश गायकवाड प्रसिद्धी प्रमुख विनोद कांबळे, सिद्धार्थ तर निमंत्रक म्हणून प्रो. अनिल वानखेडे, निलेश राजवर्धन, दीपक कासारे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
यावेळी फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोरचे संस्थापक अध्यक्ष प्रो. डॉ. रोहीदास जाधव, वाडिया कॉलेज च्या प्रिंसिपल डॉ. वृषाली रणधीर, प्रो. मेघना भोसले, आनंदा गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
नवी मुंबई शाखेच्या माध्यमातून भविष्यात विविध वैचारिक, साहित्यिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा प्रचार व प्रसार अधिक व्यापक पातळीवर करण्यासाठी ही शाखा प्रभावीपणे कार्यरत राहील, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत दादा जगताप यांनी व्यक्त केला.




