Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या : मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी (मंगेश जाधव )-निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गणेश कचकलवार यांच्या जिवीतास काही राजकीय पुढारी तसेच त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांकडून धोका असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर त्यांच्या सुरक्षेचा गंभीरपणे विचार करून तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी जोरदार मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन करण्यात येत आहे. पत्रकारिता सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या विविध समस्यानां वाचा फोडताना पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना अनेकदा दबाव धमक्या आणि विरोधाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असुन त्यांच्या जिवीताला कोणताही धोका निर्माण होण्यापुर्वीच शासन व पोलीस प्रशसनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी संघटनेची मागणी आहे. या मागणीसाठी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यातून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देण्याचे सत्र सुरु असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. पत्रकारांच्या सुरक्षेबाबत शासनाने ठोस भुमिका घ्यावी तसेच श्री. गणेश कचकलवार यांच्या सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी निवेदनांव्दारे संपर्ण महाराष्ट्रात होत आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या सुरक्षेबाबत शासनाने निर्णय घ्यावी अशी भुमिका निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने घेतली आहे महाराष्ट्रातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनी या मागणीला पाठिंबा देत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या सुरक्षेसाठी एकजूटीने उभे राहाण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!