फेस्कॉम मुंबई पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट



दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम), मुंबईचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे प्रवासातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत (कन्सेशन) पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व मागण्या गांभीर्याने समजून घेतल्या व ज्येष्ठांच्या रेल्वे सवलतीचा प्रश्न संसदेत व संबंधित केंद्रीय मंत्रालयाकडे लावून धरून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी फेस्कॉम मुंबई अध्यक्ष श्री. सुरेश पोटे, उपाध्यक्षा डॉ. रेखा भातखंडे, सदस्य श्री. संजय साने आणि सदस्या श्रीमती उज्ज्वला पठारे उपस्थित होते.




