जि.प.सदस्या सौ.शिवानी संदीप सावंत यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती : वहाळ जिल्हा परिषद गटातील नागरिकांना शासकीय कागदपत्रांच्या सत्यप्रतींसाठी स्थानिक स्तरावर सुविधा

*चिपळूण :-* वहाळ जिल्हा परिषद गटाच्या जि.प. सदस्या तथा स्थायी समिती सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे वहाळ गटातील नागरिकांना शासकीय कागदपत्रांच्या सत्यप्रती करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध झाली आहे.
विविध शासकीय व प्रशासकीय कामांसाठी अनेकदा कागदपत्रांच्या सत्यप्रतींची आवश्यकता असते. त्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत जावे लागते. मात्र, आता सत्यप्रती करून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधीकडेच सुविधा उपलब्ध झाल्याने वहाळ गटातील नागरिकांची धावपळ कमी होऊन वेळेची बचत होणार आहे.
नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित ही सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्याने शासकीय कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारीपदी झालेली ही नियुक्ती वहाळ गटातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.




