आमदार शेखर निकम यांचे दुष्काळग्रस्तांसाठी एका महिन्याचे वेतन समर्पित : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द

*चिपळूण :* दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी आपल्या एका महिन्याच्या मूळ वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या या योगदानातून संकटग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
दुष्काळामुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होत असताना, संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने आमदार निकम यांनी आपल्या वेतनाचे योगदान दिले. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या अडचणीच्या काळात समाजाने आणि लोकप्रतिनिधींनी त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे, ही भावना त्यांच्या कृतीतून व्यक्त झाली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि त्यांना संकटाचा सामना करण्यासाठी आधार मिळावा, या हेतूने केलेले हे वेतन समर्पण लोकप्रतिनिधींच्या सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण ठरत आहे.




