(Run for Health) रन फॉर हेल्थ या संकल्पनेतून खेड येथे ‘वर्षा मॅरेथॉन’ संपन्न गृह राज्यमंत्री योगेश कदम, भाजपा नेते ॲड.वैभव खेडेकर, उद्योजक बशीर हजवानी यांचा सहभाग
अनेक मान्यवरांची उपस्थिती

लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज खेड शहरात ‘लायन्स वर्षा मॅरेथॉन- २०२६’ मध्ये गृह राज्यमंत्री योगेश कदम भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, उद्योजक बशीर हजवानी यांनी शेकडो स्पर्धकांसह सहभाग घेतला.
‘Run for Health’ ही संकल्पना उत्तम आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त असून यात सहभाग घेत जेणेकरून सर्व वयोगटातील नागरिकांना उत्तम जीवनमान राखण्यास स्फूर्ती मिळेल.
या वर्षा मॅरेथॉनमध्ये राज्याच्या विविध भागातून विविध वयोगटातील स्पर्धक यात सहभागी झाले होते. यावेळी विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
मॅरेथॉनच्या माध्यमातून सुदृढ आरोग्य जपण्याची जागृती निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचा कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अध्यक्ष श्री अविनाश दळवी व सर्व लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चे सदस्य व आयोजकांचे कौतुक केले.
मुकादम लँडमार्क खेड इथून सुरू झालेल्या या मॅरेथॉनवेळी खेड नगर परिषदेचे नगरसेविकास वैभवी वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, उद्योजक शा भुरमल ज्वेलर्सचे मालक पारस जैन, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी, उत्तम कांबळे, संदीप मोरे, पंकज



शहा, राजेश जोयसर, मुकादम डेव्हलपरचे मालक शमशुद्दीन मुकादम, यांच्यासह खेड विद्यार्थी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







