Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शिरगाव विद्यालय, शिरगाव पोलीस ठाणे, आणि शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भरत लब्ध्ये मित्रमंडळातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शिरगाव विद्यालय, शिरगाव पोलीस ठाणे, आणि शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भरत लब्ध्ये मित्रमंडळातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी या सर्व कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य स्नेहा रहाटे, सरपंच नीता शिंदे, शिवसेना तालुका संघटक सुधीर भाऊ शिंदे, माजी सरपंच अनिल शिंदे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे शिरगाव वि. का. सोसायटीचे चेअरमन जयंत शिंदे, माजी चेअरमन श्रीधर(भाई) शिंदे, माजी चेअरमन सतीश शिंदे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नितीन शिंदे, शिरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत आवारे, उपनिरीक्षक श्री शिंदे, उपनिरीक्षक मुकणे, हवालदार मनोज कुळे, प्रिया मोहिते त्यांचे सर्व सहकारी, शिरगाव व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश लब्ध्ये, तंटामुक्ती अध्यक्ष राजूशेठ शिंदे, मा. उपसरपंच प्रवीण सावंत मा. उपसरपंच गणेश शिंदे,कामगार नेते दिलीप शिंदे, शाखाप्रमुख तुषार शिंदे, लियाकत कुठरेकर, बाबा कुठरेकर, रामदास बागवे, दीपक मोहिते, संजय शिंदे, शिरगाव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुंभार मॅडम, जांबोटकर सर, पालशेतकर सर व त्यांचे सर्व सहकारी, शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. सावली पवार त्यांचे सर्व सहकारी आदि अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. ही झाडे जगवण्याची जबाबदारी शिरगाव विद्यालय, शिरगाव पोलीस ठाणे, आणि प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव यांनी घेतली आहे.
विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, विविध संस्थांचे प्रमुख आणि सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल भरत लब्ध्ये यांनी सर्वांचे आभार मानून धन्यवाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!