महाराष्ट्र

वणोशी येथे बीज अंकुरण चाचणीचे प्रात्यक्षिक

प्रतिनिधी: सागर गोवळे

*वणोशी* : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी स्नेही’ रावे गटातर्फे वणोशी तर्फ पंचनदी येथे शेतकऱ्यांसाठी बीज अंकुरण चाचणी विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमामध्ये पेरणीपूर्वी बियाण्यांची अंकुरणक्षमता तपासण्याचे महत्त्व, अंकुरण टक्केवारी कशी मोजावी तसेच दर्जेदार बियाणे निवडण्याचे फायदे याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी पेट्री डिश पद्धत, गोणता (गोणपाट) पद्धत, वाळू पद्धत आणि जर्मिनेशन पेपर पद्धत या चार पद्धतींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रात्यक्षिकासाठी कृष्णा या काळ्या तांदळाच्या वाणाच्या १०० बियाण्यांचा वापर करून जर्मिनेशन पेपर पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. बियाणे योग्य अंतरावर ठेवून जर्मिनेशन पेपर गुंडाळण्याची पद्धत, आवश्यक ओलावा राखण्याचे महत्त्व तसेच चार दिवसांनंतर उगवलेल्या बियांची संख्या मोजून अंकुरण टक्केवारी = (उगवलेल्या बियांची संख्या ÷ एकूण बियांची संख्या) × १०० या सूत्रानुसार अंकुरण टक्केवारी कशी काढावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भात पिकासाठी किमान ८० ते ८५ टक्के अंकुरणक्षमता असलेले बियाणे वापरण्याचा सल्लाही देण्यात आला.

या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना घरच्या घरी सोप्या पद्धतीने बीज अंकुरण चाचणी करण्याची माहिती मिळाली. तसेच दर्जेदार बियाण्यांचा वापर केल्यास पिकाची उगवण चांगली होऊन उत्पादनवाढीस मदत होते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कु. श्रुती बोबडे, कु. आकांक्षा गाडगे, कु. समृद्धी जाधव, कु. कोमल झिरवाळ, कु. तन्वी नादिवडेकर, कु. सलोनी सावंत, कु. नीलम मदने, कु. अंकिता मुंज, कु. साक्षी लोके व कु. श्रावणी मोरे यांनी परिश्रम घेतले.

सदर प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. महेंद्र पालशेतकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!