Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

चक्रभेदी संस्थेकडून नेतृत्व करणाऱ्या महिलांचे प्रशिक्षण : व्ही बी जि राम जि योजनेचा जागर

रत्नागिरी जिल्ह्यातील नेतृत्व करणाऱ्या महिलांना चक्रभेदी सोशल फौंडेशन संस्थेच्या अध्यक्षा वैदेही सावंत यांनी विधवा व एकल महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच शिव्या मुक्त समाज अभियान आज कसे गरजेचे आहे हे समजून सांगितले. तुम्हाला असे वाटते का की समाजात कोणीही शिव्या देऊ नयेत? असे सावंत यांनी विचारले असता सर्वांनी एक मुखाने होय अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. व्ही. बी. जी. राम जी म्हणजेच मनरेगा योजना समजून सांगितली. या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात बिनखर्चिक भागीदार संस्था म्हणून निवड झाल्याची आठवण करून देत संस्थेला कोठूनही निधी नसताना केवळ समाजातील सकारात्मक परिवर्तनाठी संस्था अविरत कार्य करत असल्याचे सांगितले. जर आपण सहकार्य केले तर पुढे ही आपल्याला चांगले काम करता येईल असे सांगितले यावर काही महिलांनी विधवा महिलांसाठी व व्ही. बी. जि. राम.जि.(मनरेगा )अंतर्गत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख कांचन नागवेकर,निवळी सरपंच तन्वी कोकजे, जि. प. सदस्य हर्षदा गावडे, जि. प. सदस्य माधवी गिते, प. स. सदस्य अनुष्का खेडेकर, प. स. सदस्य पूर्वा दळवी, शिरगांव साक्षी कुमठेकर, शुभांगी पंडये (मिरजोळे )इ. ऐकूण तीस महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे वैदेही सावंत यांनी आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!