ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त इस्लामियत प्रश्नमंजुषा व नात स्पर्धेचे आयोजन : कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कोकण सिरत कमिटीचे आवाहन

चिपळूण : ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र निमित्ताने कोकण सिरत कमिटी, चिपळूण यांच्या वतीने तालुकास्तरीय इस्लामियत प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय ग्रुप नात गायन स्पर्धा २०२६चे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता, अल मरहूम हाजी शमसुद्दीन खतीब असेंब्ली हॉल, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल, गोवळकोट, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना वासिफ अख्तर जुनेद काझमी (आलिम-ए-दीन, चिपळूण) राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना सलीम गुलाम मोहिउद्दीन पारकर आणि मौलाना इलियास अमीर बगदादी उपस्थित राहणार आहेत.
तसेच कार्यक्रमाला इब्राहिम अहमद वांगेडे, मकबूल मेहमूद साबळे आणि फय्याज अहमद सुर्वे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये इस्लामियतचे ज्ञान, धार्मिक संस्कार तसेच नात गायनाची कला विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कोकण सिरत कमिटी, चिपळूणच्या वतीने सर्व नागरिक, पालक, विद्यार्थी, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सीरत कमिटी चे अध्यक्ष सज्जाद काद्री, उपाध्यक्ष शाहनवाज शाह व सचिव मुजाहिद मेयर यांनी केले आहे.करण्यात आले आहे.




