रत्नागिरी जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, अशोक पारदळे यांचे निधन

रत्नागिरी जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, अशोक पारदळे यांचे निधन
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
गुहागर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवकआणि कुणबी समाजातील आदर्श व्यक्तिमत्व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पेवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, विकास सोसायटीचे माजी चेअरमन अशोक गणपत पारदळे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी त्यांच्या पेवे पारदळेवाडी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखद निधन झाले आहे त्यांच्या पार्थिवर शोकाकुल वातावरणामध्ये पारदळेवाडी शमशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर विनय नातू पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाल, मंगेश जोशी, निसार खान सरगुरो, बाबा भालेकर, यशवंत बाईत, अभय भाटकर खालीद खान मंगेश सोलकर, मोहन तांबे, वैभव आदवडे, भगवान कदम, दिनकर पारधी, रामचंद्र टेरवकर, उमेश खैर, दीपक साळवी, प्रशांत जांर्भूगेकर, सचिन साळवी, रघुनाथ घाणेकर, यांच्यासह तालुक्यात विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. पेवे गावातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व अचानक हरपल्याने पेवे गावावर शोककला पसरला आहे. त्यांच्या या अकाली निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.




