Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

शाहीन स्कूल कराड येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार ; वृक्षारोपण उपक्रमाने कार्यक्रमाची सांगता

कराड, प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये शाहीन स्कूल, कराड येथील विद्यार्थी मोहम्मद अब्दुल कादिर मुजावर यांनी जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाजातील युवकांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याला शुभेच्छांसह रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहीन स्कूल कराडचे मुख्याध्यापक सय्यद सर उपस्थित होते. त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व, तयारीची दिशा आणि स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शाहीन हायस्कूलचे मुख्याध्यापक मोमीन सर यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश संपादन करता येते, असा मौलिक संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक शमसूद्दीन सर यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक व समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमासाठी सुलतान मुल्ला (कटापुरे), तौफिक मुल्ला, तौफिक दिलावर मुल्ला, अरशद मुल्ला आणि साकिब भालदार यांची विशेष उपस्थिती लाभली.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने “एक पेड माँ के नाम” या पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक व पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त झाले.
या कार्यक्रमामध्ये शाहीन स्कूल कराडचे सर्व शिक्षक उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या यशाचे कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्याच्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाहीन स्कूल कराडमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळाली.









Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!