Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

शृंगारतळी परिसरात उनाड गुरांचा वाढता वावर वाहनचालकांना मोठा मनस्ताप नागरिकही हैराण

प्रतिनिधी (मंगेश जाधव )-गुहागर तालुक्याचा केद्रबिदु असणाऱ्या शृंगारतळी गजबजलेल्या शहरामध्ये रस्त्यावर मोकाट गुरांचे मोठमोठे कळप ठिकठिकाणी दिसत असल्याने वाहतूकीची मोठी कोंडी होत असून नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. चिखली ते पाटपन्हाळे काँलेज या दरम्यान रस्त्यावर गुरांचे कळप बसलेले आढळून येत असल्याने वाहनचालक आणि विशेषतः दुचाकीस्वरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुरे येण्या -जाण्याच्या रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे अचानक उध्दभवणार्या परिस्थितीमुळे वाहनचालकांना गाड्या नियंत्रित करणे कठीण होऊन जाते रात्रीच्या वेळी जर अंधारात ही गुरे दिसत नसल्यामुळे गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या या गुरांना नेमके वाली -वारस कोण नाही का असा संतप्त सवाल त्रस्त वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः दूचाकी चालकांसाठी हा प्रश्न अत्यंत धोकादायक बनला आहे बसलेल्या किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या गुरांमध्ये अचानक वाद किंवा आपसात झोंबी
झाल्यास ती बिथरण्याची शक्यता असते अशावेळी ती समोरून जाणाऱ्या वाहनांच्या अंगावर धावून जाऊन मोठी दुखापत घडवू शकतात या गंभीर समस्येमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबधित प्रशासनाने तातडीने या प्रकाराची दखल घ्यावी. रस्त्यावर विनाकारण भटकणार्या आणि अडथळा ठरणार्या या गुरांचा बदोबस्त करुन त्यांना तात्काळ त्यांच्या संबंधित मालकांच्या स्वाधीन करावे अशी जोरदार मागणी संतप्त नागरिक व वाहनचालकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!