Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

यशवंत शिक्षण संस्था भोम संचलित महादेवराव शिर्के विद्यालय भोम येथे व्यवसाय मार्गदर्शन

महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोम या विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६- २७ मध्ये विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसाय मार्गदर्शन या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन दर वर्षाप्रमाणे करण्यात आले. या वर्षी डिजिटल कक्षात दोन गटातून मार्गदर्शन विद्यालयाचे शिक्षक श्री गणेश सोनवणे यांनी दिले. विद्यालयात दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित शिक्षक इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांना सामुहिक व्यवसाय मार्गदर्शन करणार आहेत.
व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व, व्याप्ती , उपयोगिता, विविध रोजगाराच्या उत्तम संधी, व्यावसायिक शिक्षणातील योग्य ट्रेडची निवड, आवश्यक माहिती व व्यवसाय समुपदेशन यावेळी करण्यात आले. यावेळी हॉटेल मॅनेजमेंट अँड टूरीझम्, बॅचलर आॅफ कॉम्पुटर अॅप्लिकेशन, फॅशन डिझाईन, आर्कीटेक्चर, नर्सिंग केअर, ए. एन. एम., जी. एन. एम., कला, वाणिज्य, शास्त्र, JEE, NEET, NDA, डिजिटल, सैन्यदल, मर्चंट नेव्ही, डी. एम. एल. टी., MPSC, UPSC, आय. टी. आय. फिटर, टर्नर, प्लंबर, इलेकट्रीशियन्, बांधकाम व्यावसायिक, कृषी आदी व्यावसायासंदर्भात मार्गदर्शन केले. डिजिटल कक्षात पी. पी. टी. व प्रेरणादायी व्हिडीओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना १००% रोजगाराच्या विविध संधी सहज मिळतात या विषयी विश्वास दिला.
शासकीय, निमशासकीय, खाजगी कंपन्या, सैन्यदल, आय. टी. कंपन्या, रेल्वे, पोस्ट ऑफिस, ३ , ५ स्टार भारतातील, परदेशातील हॉटेल्स, मर्चंट नेव्ही, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, हॉटेल व्यवसाय अश्या कितीत्तारी संधी व्यावसायिक शिक्षणाने मिळतात. व्यावसायिक शिक्षण घेणे हे आजच्या काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन याचा फायदा घेणे अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन मार्गदर्शक श्री गणेश सोनवणे यांनी केले.
सर्व विद्यार्थी यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रमाची सांगता आभार मानून करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!