Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

तळवली हायस्कूलमध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेत दि. 5 सप्टेंबर 2026 रोजी ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर इतर शिक्षक वृंद यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. कुळे सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कु. शृष्टी धामणस्कर हिने या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर कु. कु.दुर्वा टेरवकर,कु.हर्षदा भुवड, कु.नमिता कारेकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करुन शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार सर यांच्या हस्ते जेष्ठ शिक्षक श्री.साळुंके सर,सौ.नाईक मॅडम,श्री.देवरुखकर सर, श्री.गुरसळे सर,श्री. गवळी सर, श्री.बागल सर, श्री.केळस्कर सर, श्री.कुळे सर, श्री.कोवळे सर,सौ.कांबळे मॅडम, प्रा. जड्याळ सर, प्रा.आयरे मॅडम, प्रा.सावंत मॅडम, इत्यादी शिक्षक वृंदाना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी जेष्ठ शिक्षक श्री.साळुंके सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित मौलिक असे विचार व्यक्त शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. एम. ए.थरकार सर यांनी शिक्षक दिन का साजरा केला जातो, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिनीच शिक्षक दिन का साजरा होतो आणि देशाच्या जडणघडणीत शिक्षकाचे योगदान किती महत्त्वाचे आहे. या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रशालेचे कला शिक्षक श्री. कुळे सर यांनी सुंदर असे फलक लेखन केले होते. तिकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली.या कार्यक्रमासाठी अक्षय चव्हाण व सौ. पालकर यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!