महाराष्ट्र
BHMS अंतिम वर्षात नजिफ आसिफ भाटकर यांचे उल्लेखनीय यश


प्रतिनिधी – मुबीन बामणे
हर्णै : कु. नजिफ आसिफ भाटकर यांनी BHMS अंतिम वर्षाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशामागे असलेली मेहनत, जिद्द, सातत्य आणि अभ्यासातील चिकाटी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नजिफ यांच्या यशाबद्दल नॅशनल हायस्कूल हर्णैच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत, भविष्यात उत्तम वैद्यकीय सेवा बजावून समाजाच्या आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




