तळवली येथे शेतकरी लावणी महोत्सवाचे आयोजन ; यंत्राद्वारे आधुनिक पद्धतीच्या भात लावणीचा शेतकऱ्यांनी घेतला अनुभव

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
गुहागर तालुक्यातील तळवली येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी विभागाच्यावतीने भात लावणी महोत्सव पार पडला.यावेळी यंत्राद्वारे आधुनिक पद्धतीच्या भात लावणीचा येथील शेतकरी वर्गाने अनुभव घेतला.
तालुका कृषी विभाग गुहागर यांच्यामार्फत भाजावळ राब न करता प्लास्टिक ट्रेमध्ये भात रोपवाटिका तयार करून यंत्राद्वारे लागवड करण्याचे प्रात्यक्षिक यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाला दाखवण्यात आले.यामध्ये प्लास्टिक ट्रेमध्ये भात रोपवाटिका तयार केल्यामुळे उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होऊन भात शेती फायदेशीर कश्या प्रकारे ठरू शकते याचे प्रात्यक्षिकासह महत्व सांगण्यात आले.ट्रेमध्ये भात रोपवाटिका तयार करणे पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आहे असेही कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
यावेळी या प्रत्यक्षिकासाठी उपस्थित शेतकरी वर्गाला तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी योग्य मार्गदर्शन केले. या शेतकरी लावणी महोत्सवासाठी मोठया संख्येने ग्रामस्थ व सरपंच मँडम मयुरी शिगवण तळवली कृषी अधिकारी संतोष जावळे. सी. आर. पी मँडम कावेरी कोळवणकर पाणी फाऊंडेशनचे अधिकारी गौरव सर आदी मान्यवर उपस्थित होते.





