Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

खरे खून प्रकरणातील आरोपीना जन्मठेप प्रभावी तपासासाठी पोलीस निरिक्षक सचिन सावंत व पोलीस हेडकाँन्टबल आशिष शिंदे सन्मानित

‎ प्रतिनिधी (मंगेश जाधव)- गुहागर तालुक्यातील गाजलेल्या विश्वास खरे खून प्रकरणातील आरोपीना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर हा गुन्हा शाबीत करण्यासाठी सरकार पक्षातर्फे प्रभावीपणे काम करणार्यां गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन सावंत आणि पोलीस हेडकाँन्टेबल आशिष शिंदे यांचा विशेष सत्कार करुन गौरव करण्यात आला.

गु. र. नं. 67/2014अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 302.394.व34अन्वये दाखल असलेल्या या प्रकरणाचा सेशन केस क्रमांक 14/2020असा होता या खटल्यात आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे (वय. 37 रा. बोफखेल खडकी पुणे )आणि किरण रामदास कुचेकर (वय. 34 उत्तममहानगर वारजे माळवाडी पुणे )यांच्या विरोधात सरकार पक्षाने ठोस पुरावे व प्रभावी मांडणी केल्याने केल्याने न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र चंद्र किशोर मीणा यांच्या हस्ते रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच चिपळूण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या उपस्थितीत गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन सावंत व पो. हेडकाँन्टेबल आशिष शिंदे यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्माननीत करण्यात आले. या गौरवामुळे गुहागर पोलीस ठाण्याच्या तपासकौशल्याची आणि न्यायालयीन प्रक्रियेत प्रभावी समन्वय साधन्याच्या क्षमतेची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली असून पोलीस दलातही या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!