Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

सावर्डेतील हायवेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास इंदिरा काँग्रेस तर्फे रस्ता रोको चा इशारा -रफिक मोडक

सावर्डे : पनवेल-महाड-पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या बांधणीच्या सुरुवातीपासून 2015 पासूनच येथील स्थानिक लोकांच्या स्थानिक रस्त्यावरील येणाऱ्या समस्यांबाबत त्या त्या वेळी लेखी स्वरूपात इंदिरा काँग्रेसच्या माध्यमातून निवेदने देत आलेलो आहे महामार्गामुळे बाधित होणारे व्यापारी सामान्य लोक शाळा, धार्मिक स्थळे,सर्विस रोड,गटारे त्यांची उंची भराव पूल जंक्शन, फुट ओव्हर ब्रिज असे विविध प्रश्न हाताळले गेले यापैकी सावर्डे हे एक शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे गाव असून जी.एन.एस.स्कूल जुनियर कॉलेज प्राथमिक शाळा मधील सुमारे 4000 विद्यार्थी रोज हायवे ओलांडत असतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 12-6-2023 व 15-6- 2023 रोजी फुट ओव्हरबीज संबंधी निवेदन दिले होते त्यानुसार 29-8-2023 रोजी उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग चिपळूण मार्फत सन 2023/24 अंतर्गत बांधकाम आराखडा पाठवण्यात आला होता व तो मंजूर झाला आहे त्याचप्रमाणे सद्य परिस्थितीत डेरवण फाटा आणि एसटी स्टँड अशा दोन्ही ठिकाणी नेहमी अपघात होत आहेत तरी कोणतीही जीवितहानी होऊ नये सामान्यांचे नुकसान होऊ नये म्हणून याही दोन ठिकाणीही फूट ओव्हर ब्रिज मंजूर करावेत म्हणून तसेच सावर्डे स्टॅन्ड,दहिवली फाटा व डेरवण फाटा येथे रस्ता ओलांडण्यासाठी जंक्शन निर्मिती करण्यात यावी याचीही मागणी केली गेली आहे आज दिनांक 6-8-2026 पुन्हा एकदा इंदिरा काँग्रेसच्या तर्फे उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग चिपळूण यांना निवेदन देऊन रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!