Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

चिखलगाव येथे उबाठा गटाला मोठा धक्का; शाखाप्रमुख राजेश शिगवण यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश


प्रतिनिधी: सागर गोवळे)
​चिखलगाव:स्थानिक राजकारणात उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. चिखलगाव येथील उबाठा शाखाप्रमुख व गाव अध्यक्ष श्री. राजेश शिगवण यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला.
​उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वावर आणि मतदारसंघातील विकासाभिमुख कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चिखलगाव आणि परिसर क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाची ताकद अधिक भक्कम झाली आहे.
​या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी शिंदे गटाचे शाखाप्रमुख श्री. योगेश रामाने, महिला संघटिका व माजी सदस्य सौ. संघवी शिगवण तसेच श्री. प्रकाश कापडी आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
​विकासाच्या मुद्द्यावर वाढता पाठिंबा
राज्यासह संपूर्ण मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या धडाकेबाज विकासकामांना स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या प्रवेशामुळे महायुती आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाला तळागाळात अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!