Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे अखलाक सावंत यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार तर गुलजार डोंगरकर यांचा पतपेढीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

अन्य गुणवंतांचाही सत्कार

दिनांक २६ जुलै रोजी रत्नागिरी येथे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ १११३८ महाराष्ट्र शाख रत्नागिरी आयोजित सत्कार समारंभात सौ.गुलजार डोंगरकर मॅडम यांची बिन विरोध रत्नागिरी शिक्षक पतपेढीवर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक श्री अखलाक कासिम सावंत हे दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी आपल्या दिर्घकाळ सेवेतून सेवा निवृत्ती होत असल्याने त्यांचा सत्कार करुन त्यांचा पुढील आयुष्य सुखमय जावो अशी प्रार्थना करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्याच प्रमाणे शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिल्ड देऊन त्यांना पुढील शिक्षण अधिक प्रभावी व्हावे म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी उपस्थित पतपेढी संचालक मंडळ विविध शिक्षक संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ रत्नागिरी जिल्हाचे अध्यक्ष हिदायत कासिम नाईक सर्व संघटनेचे सदस्य पदाधिकारी सर्व तालुक्याचे अध्यक्ष पदाधिकारी व सर्व शिक्षक उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अखलाक जैनुद्दीन परकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!