Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला गुहागरकरांचा सलाम : आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

प्रतिनिधी (मंगेश जाधव)- नीट परिक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर संघर्षादरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना गुहागर मध्ये अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “आम्ही गुहागरकर”या बँनर खाली आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी. पालक. नागरिक. मोठ्या संख्येने सहभागी होत विद्यार्थ्यांच्या न्याय लढ्याला पाठिंबा दर्शविला. दिल्लीतील जंतर. मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करत तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्याना शासनाने मान्यता दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यासाठी सोमवारी गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी “आपली एकजूट आपली संवेदना आपली जबाबदारी हाच खरा गुहागरचा अभिमान आहे ” असा संदेश उपस्थितांनी दिला. विविध श्रेत्रातील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या संघर्षाची एकात्मता व्यक्त केली. या श्रद्धांजली कार्यक्रमात मनसे गुहागर तालुका संपर्क प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले, अँड संकेत साळवी ,मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर अमिष कदम ,उपसरपंच आसीम साल्हे, अमित कुबडे, अजित बेलवलकर ,शोएब मालाणी ,साबीर साल्हे ,सुदेश हडकर ,संतोष सोलकर, पंकज दळवी, भूषण पवार, पंकज बिर्जे, मयूर गमरे, मृणाल रुमडे, अमोल जामसुतकर, क्रांती साळवी, सोहम सातार्डेकर ,नारायण आग्रे, समित घाणेकर ,शशिकांत जाधव, प्रभूनाथ देवळेकर यांच्या सह मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठीचा लढा हा केवळ विद्यार्थ्यांचा नसून संपुर्ण समाजाचा असल्याचा ठाम संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!