Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

वणोशी येथे कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी स्नेही’ गटामार्फत मित्रबुरशी ‘ट्रायकोडर्मा’ वाढीचे प्रात्यक्षिक संपन्न


( दापोली-प्रतिनिधी: सागर गोवळे.)
​वणोशी:विशेष ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमा (RAWE) अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी स्नेही’ गटामार्फत वणोशी तर्फ पंचनदी येथील बौद्धवाडी येथे जैविक बुरशीनाशक ‘ट्रायकोडर्मा’च्या वाढीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
​या प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांना १० किलो चांगले कुजलेले शेणखत, ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा कल्चर आणि आवश्यकतेनुसार पाणी वापरून ट्रायकोडर्मायुक्त शेणखत तयार करण्याची सोपी पद्धत प्रत्यक्ष दाखवण्यात आली. थेट सूर्यप्रकाश टाळून सावलीच्या ठिकाणी हे मिश्रण एकत्र करणे, योग्य आर्द्रता राखून ते झाकून ठेवणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
​ट्रायकोडर्माचे प्रमुख फायदे व कार्य:
​जैविक नियंत्रण: ट्रायकोडर्मा ही माती व बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगकारक बुरशींवर परजीवी म्हणून आक्रमण करते आणि विविध एन्झाइम्सद्वारे त्यांचा नाश करते.
​पिकांची वाढ: याच्या वापराने पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मुळांची जोमदार वाढ होते.
​बहुउपयोगी: भात, नाचणी, कडधान्ये, भाजीपाला, आंबा, काजू, नारळ, केळी व ऊस अशा अनेक पिकांमध्ये हे अत्यंत प्रभावी ठरते.
​शाश्वत शेती: रासायनिक बुरशीनाशकांवरील खर्च व अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणपूरक शेतीस प्रोत्साहन मिळते.
​या कार्यक्रमात स्थानिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जैविक रोग व्यवस्थापनाची माहिती घेतली. प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी कन्या श्रावणी मोरे, साक्षी लोके, समृद्धी जाधव, तन्वी नादिवडेकर, कोमल झिरवाळ, नीलम मदने, आकांक्षा गाडगे, श्रुती बोबडे, अंकिता मुंज व सलोनी सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
​सदर उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. परेश पोटफोडे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!