अंजनवेल कॉलेजमध्ये इयत्ता ११ वी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

प्रतिनिधी (मंगेश जाधव )
डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हने ता. चिपळूण संचालित दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय व भागीर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल ता. गुहागर जि. रत्नागिरी या कानिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी प्रवेशित नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली. विचार मंचावरील सर्व प्रमुख मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सरस्वतीच्या प्रतिमेला मिलिंद अशोक शितूत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या प्रतिमेला तुषार मधुकर नरवनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर कॉलेजचे प्राचार्य श्री. मंगेश गोरीवले यांच्या हस्ते विचार मंचावरील सर्व. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य आणि पुष्प देऊन यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी युनिटेक कॉम्पुटर एज्युकेशन सेंटर शृंगारतळी चे जहूर बोट सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य मंगेश गोरीवले यांच्या हस्ते जहूर बोट याचा विशेष सत्कार करण्यात आला.
या स्वागत सोहळा कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मिलिंद शितूत, समीर लवंडे, सिमरण वाडये, तुषार नरवनकर, विष्णू कदम, कृष्णा भुरावणे, सुभाष सुर्वे, मधुरा नाचरे, स्वरा पालकर, शीतल पडवळ हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
प्रात्साविक प्रा. शलाका पाटील तर आभार प्रा. उज्वला भोंबसकर यांनी व्यक्त केले.





