Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

चिपळुणात ‘निर्भय बनो.. भारत जोडो रिल्स स्पर्धेचे आयोजन

चिपळूण – सामाजिक सलोखा, एकता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘ निर्भय बनो…. भारत जोडो’ या उपक्रमांतर्गत रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे‌. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून नागरिकांनी विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेचा विषय २ ऑगस्ट २०२६ रोजी चिपळूण येथे होणाऱ्या ‘सामाजिक एकता परिषद’ या संकल्पनेवर आधारित आहे. स्पर्धकांनी आपल्या रिल्समधून सामाजिक ऐक्य, बंधुता, संविधानिक मूल्ये आणि सलोख्याचा संदेश प्रभावीपणे मांडणे अपेक्षित आहे.रिल्स एक ते दीड मिनिटांची असावी. स्पर्धेचा विषय स्पष्टपणे सादरीकरणात अधोरेखित होणे आवश्यक असून कोणत्याही व्यक्ती, धर्म, जात किंवा समाज घटकाच्या भावना दुखावतील असे दृश्य अथवा संवाद टाळणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी आपली रिल्स २५ जुलै २०२६ पर्यंत इंस्टाग्राम वर अपलोड करावी.
रिल्स अपलोड करतांना ssdtrust या collaboration ID ला Collaborate request पाठविणे आवश्यक आहे. तसेच “सामाजिक एकता हे आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे” हा कॅप्शन आणि #nirbhaybano #Bharatjodo #Indianconstitutaion #ssdtrust हे हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे. स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना योग्य बक्षीस व प्रमाणपत्र देऊन 2 ऑगस्ट रोजी आयोजित सामाजिक एकता परिषद या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 7720039406 किंवा 8329749348 या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच 2 ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे होणाऱ्या ‘सामाजिक एकता परिषद’ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!