तळवली हायस्कूल मध्ये सामाजिक वनीकरण तर्फे वृक्षारोपण
सामाजिक वनीकरण विभागाचे शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता.गुहागर जि.रत्नागिरी या प्रशालेत सामाजिक वनीकरण रत्नागिरी परिक्षेत्र गुहागर तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.*
सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरीचे श्री.शिंदे साहेब हे यावेळी उपस्थित होते. त्यांनी प्रशालेत वृक्षारोपण करणेसाठी विविध प्रकारचे वृक्ष दिले.प्रशालेमध्ये कार्यरत असलेल्या ‘इको क्लब ‘ तर्फे शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सौ.नाईक मॅडम, श्री.देवरुखकर सर श्री. गवळी सर यांनी सहकार्य केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार सर, इको क्लब प्रमुख सौ. नाईक मॅडम ,श्री. बागल सर , सौ. कांबळे मॅडम इयत्ता 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते शालेय परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. यावेळी श्री. अक्षय चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. यावेळी मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार सर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगुन वृक्षांची जोपासना करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





