Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

चिपळूण शहरातील राहुल गार्डन रोड बांदल हायस्कूल समोरील खड्डे त्वरित भरा, अन्यथा उपोषण करणार – राजेश सुर्वे चिपळूण (प्रतिनिधी) – चिपळूण शहरातील राहुल गार्डन रोड येथील बांदल हायस्कूलसमोर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सदर रस्त्यामधून हायस्कूलमध्ये विद्यार्थी जात असताना खड्ड्यांतून वाहन गेल्यावर त्याचे पाणी थेट पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत असल्याने विद्यार्थ्यांतून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत चिपळूण येथील अपंग कल्याण विभागाचे शहराध्यक्ष राजेश रामचंद्र सुर्वे वारंवार चिपळूण नगर परिषदेमध्ये जाऊन प्रशासनाला सांगूनसुद्धा नगरपरिषद खड्डे भरण्याची तसदी घेत नाही, अशी माहिती सुर्वे यांनी पत्रकारांना दिली. सदरचे खड्डे त्वरित भरले गेले नाहीत तर नगर परिषदेसमोर उपोषणास बसावे लागणार, असे त्यांनी सांगितले. तरी याबाबत प्रशासन कोणती दखल घेते, याकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे.

चिपळूण (प्रतिनिधी) – चिपळूण शहरातील राहुल गार्डन रोड येथील बांदल हायस्कूलसमोर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सदर रस्त्यामधून हायस्कूलमध्ये विद्यार्थी जात असताना खड्ड्यांतून वाहन गेल्यावर त्याचे पाणी थेट पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत असल्याने विद्यार्थ्यांतून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत चिपळूण येथील अपंग कल्याण विभागाचे शहराध्यक्ष राजेश रामचंद्र सुर्वे वारंवार चिपळूण नगर परिषदेमध्ये जाऊन प्रशासनाला सांगूनसुद्धा नगरपरिषद खड्डे भरण्याची तसदी घेत नाही, अशी माहिती सुर्वे यांनी पत्रकारांना दिली.
सदरचे खड्डे त्वरित भरले गेले नाहीत तर नगर परिषदेसमोर उपोषणास बसावे लागणार, असे त्यांनी सांगितले. तरी याबाबत प्रशासन कोणती दखल घेते, याकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!