महाराष्ट्र
द सिनियर सिटीझन मंगो गार्डन यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त लता प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम




या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ लता प्रकाश पवार व प्रमुख पाहुणे श्री आर सी सिंग व डॉ.विक्रम पारेख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांचे अध्यक्ष सौ.लता प्रकाश पवार यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले.
गीत गायन, नृत्याविष्कार व नाट्य यांमुळे या कार्यक्रमाला फारच रंगत आली. टर्म इन्शुरन्स ही नाटिका हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या कार्यक्रमात ८० वर्षांवरील ६ जेष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अशा या रंगतदार कार्यक्रमास सूर्योदय बँकेकडून १०,००० रुपयांची देणगी देण्यात आली .त्यांचे कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आभार व्यक्त केले. भोजनाचा आस्वाद घेऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




