महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोम मध्ये नागपंचमी साजरी

महादेवराव शिर्के माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय भोम या विद्यालयात नागपंचमी हा प्रादेशिक सण सापाच्या संदर्भातील वैज्ञानिक मूल्य, संरक्षण, संवर्धन, जतन, सर्पाची उपयोगिता व शेतीसाठी होणारा फायदा या बाबतीचे मार्गदर्शन बहुउद्द्षीय सभागृहात विद्यार्थ्यांना देऊन साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तानाजी कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
भारतातील सर्पाच्या विविध प्रादेशिक जाती, त्यांचे प्रादेशिक अधिवास, कोकणासह महाराष्ट्रातील लोक समजुती, अंधश्रद्धा, सापाच्या भ्रामक कथा, गारुडी व त्याचा डोलणारा साप, चित्रपट सृष्टीतील काल्पनिक व मनोरम्य अथवा भयावह सादरीकरण त्याचा मानवाच्या मानसिकतेवर होणारा दीर्ध परिणाम याबाबत माहिती दिली. विषारी व बिनविषारी साप, शेतकऱ्याचा मित्र, सर्पाच्या विषावर झालेले व होणारे वर्तमानातील विविध देशातील संशोधन मानवजातीसाठी लसी उपयुक्त ठरत आहेत असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आधुनिक काळात डिस्कव्हरी, अनिमल प्लॅनेट, आदी पर्यावरण पूरक चॅनेलचा उपयोग ज्ञ वाढीसाठी करून रोजगारक्षम बनले पाहिजेअसेही संबोधित केले. उपस्थित इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थी व सर्व शिक्षक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




