Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

रानमाया’ प्रदर्शनातून रानभाज्यांच्या पोषणमूल्यांचे प्रबोधन; भाटघरमध्ये ५३ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग


(दापोली- प्रतिनिधी:सागर गोवळे)
​भाटघर:कृषी महाविद्यालय दापोलीच्या ‘रावे’ (RAWE – ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम) उपक्रमांतर्गत भाटघर येथील हनुमान मंदिरात ‘रानमाया’ रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सोवेली, भाटघर आणि मुगीज केंद्रातील विद्यार्थ्यांनी या संयुक्त उपक्रमाचे आयोजन केले होते. विस्मृतीत चाललेल्या पारंपरिक रानभाज्यांचे औषधी व पोषणमूल्य शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
​या प्रदर्शनात औषधी गुणधर्मांची माहिती देणाऱ्या चार्टसह तब्बल ४० प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘रावे’चे प्रादेशिक प्रमुख डॉ. विजयकुमार देसाई यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे, कृषी अधिकारी व्ही. डी. म्हस्के, सोवेलीचे सरपंच जयेश मानकर, डॉ. एस. एन. काळे, डॉ. झगडे व डॉ. शिगवण सर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
​नाविन्यपूर्ण पाककला स्पर्धा आणि विजेते:
यावेळी आयोजित पाककला स्पर्धेत ५३ महिलांनी सहभाग नोंदवत रानभाज्यांपासून तयार केलेले विविध वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ सादर केले. दोन गटांत पार पडलेल्या या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
​मुगीज-भाटघर गट:
​प्रथम: विजया कदम (भाटघर) – भारंगीची खीर
​द्वितीय: अंकिता मडगूळ (मुगीज) – तारंगी कटलेट
​तृतीय: अर्चना तांबे (भाटघर) – टाकळ्याची पुरी
​उत्तेजनार्थ: प्राजक्ता खळे – कावळीची वडी
​सोवेली गट:
​प्रथम: मिनाक्षी शिंदे – मिक्स भाज्यांचा पराठा (भारंग, कुर्डू, माठ)
​द्वितीय: अरुणाई चव्हाण – सुरणाची वडी
​तृतीय: माधुरी चव्हाण – शतावरी भाजी
​उत्तेजनार्थ: संजीवनी सोविलकर – पेवाची भाजी
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमी चिबडे हिने केले, तर सलोनी राणे हिने उपस्थितांचे आभार मानले. स्थानिक महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि नाविन्यपूर्ण पदार्थांमुळे प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दुर्लक्षित रानभाज्यांना नव्याने ओळख मिळवून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!