Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

वहाळ येथे २५ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिर; तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्वचा, दंत व नेत्र तपासणी : वहाळ जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन लाभ घ्यावा -जि.प. सदस्या शिवानी संदीप सावंत यांचे आवाहन

*चिपळूण :* प्राथमिक आरोग्य केंद्र वहाळ व रोटरी क्लब चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र, वहाळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी, मार्गदर्शन व आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबिरात त्वचारोग तज्ज्ञांकडून त्वचेची तपासणी करण्यात येणार असून ॲलर्जी, जळजळ, खाज, त्वचेवरील मऊमेळे, डाग, केसांच्या समस्या तसेच त्वचेच्या सौंदर्याशी संबंधित समस्यांबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेता येणार आहे. तसेच दंत चिकित्सक तज्ज्ञांकडून दातांची तपासणी, दातांमधील कीड, वेदना, सूज आदी समस्यांची तपासणी करून दातांची स्वच्छता व दंत आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नेत्र तपासणीमध्ये दृष्टीची तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी, डोळ्यांशी संबंधित आजारांची तपासणी तसेच आवश्यक सल्ला व उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे डोळे, दात किंवा त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असलेल्या नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
या आरोग्य शिबिरासाठी डॉ. अतुल बोरोटे (MBBS, DNB – मेडिसिन), अपरांत हॉस्पिटल; डॉ. पूजा भुरण(BAMS, DGO), अपरांत हॉस्पिटल; डॉ. प्रवीण चव्हाण,आयुर्वेदिक चिकित्सक तज्ज्ञ, स्प्रिंग क्लिनिक; तसेच डॉ.राजेंद्र कवठेकर(BDS.IQE(I).MBPMH.UK ) यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वहाळ जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!