गणपती सणाच्या धामधूमीच चोरट्याने बंद घर केले साफ : गुहागर पोलिसांसमोर पावणे दोन लाखाच्या चोरीचे आव्ह वेळंब गावातील प्रकार

प्रतिनिधी (मंगेश जाधव)-गुहागर तालुक्यातील वेळंब गुरव वाडी येथील बंद घराचा कडी- कोयडा किंवा खिडकीची कोणतीही तोडफोड न करता अज्ञात चोरट्याने घरातील पर्समधून सोन्या -चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1लाख 71हजार 42रुपयांचा मुद्दामाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी पुनम गजानन गुरव वय. 34 व्यवसाय गृहिणी रा. वेळंब गुरव वाडी ता. गुहागर जि. रत्नागिरी सध्या मुंबई यांच्या राहात्या घरात 13संप्टेंबर रोजी रात्री 9वाजल्यापासून 14संप्टेंबर रोजी सकाळी 9वाजेपर्यंत कालावधीत चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाच्या कडी-कोयड्याची खिडकीची अथवा अन्य कोणत्याही भागाची मोडतोड न करता घरात प्रवेश करून पर्समधील दागिने व रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 33.390ग्रँम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र 90ग्रँम सोन्याची साखळी 5ग्रँम सोन्याची साखळी प्रत्येकी 1ग्रँम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी 2ग्रँम वजनाचे दोन सोन्याचे झुमके प्रत्येकी 1ग्रँम वजनाच्या दोन नथ तसेच चांदीच्या विविध दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय 4हजार 300रुपयाची रोख रक्कमही चोरीस गेली आहे चोरीस गेलेल्या सर्व मुद्देमालाची एकुण किमंत 1लाख 71हजार 42रुपये असल्याचे पोलिसांनी सागितले. या प्रकरणी पुनम गुरव यांच्या फिर्यादीवरून गुहागर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा रजिस्टर क्रमांक 94/2026नोद करण्यात आली असुन भारतीय दंड विधानातील कलम 380अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरात कोणतीही तोडफोड न करता चोरी झाल्याने चोरट्याने घराची माहिती असलेल्या व्यक्तीचा सहभाग आहे का यासह विविध शक्यता पोलिसांकडुन तपासल्या जात आहेत अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.




