Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा सोवेली क्र. १ मध्ये ‘मृद्गंध’ ग्रुपतर्फे कोकेडामा कार्यशाळा व जागतिक नारळ दिन उत्साहात साजरा


(दापोली- प्रतिनिधी: सागर गोवळे.)
सोवेली (चव्हाणवाडी):
विद्यार्थ्यांमध्ये शेती व उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी चव्हाणवाडी, सोवेली येथील ‘मृद्गंध’ ग्रुपच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा सोवेली क्र. १ मध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत ‘कोकेडामा कार्यशाळा’ आणि ‘जागतिक नारळ दिन’ मोठ्या उत्साहात पार पडला.
​कोकेडामा कार्यशाळेतून जपानी कलेचे प्रात्यक्षिक
३१ ऑगस्ट रोजी कुंडीविना वनस्पती फुलवण्याच्या जपानी ‘कोकेडामा’ कलेवर आधारित कार्यशाळा पार पडली. कु. मयुरी मिसळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कोकोपीट व गांडूळ खताचे मिश्रण तयार करणे, मुळांभोवती मातीचा गोळा बनवणे, नारळाच्या काथ्याने (Coir) तो सुरक्षित गुंडाळणे आणि धाग्याने बांधणे या पायऱ्या प्रत्यक्ष शिकून स्वतः कोकेडामा तयार केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन व संघकार्याचे महत्त्व समजले.
​खाद्यसंस्कृती व प्रजातींच्या प्रदर्शनाने रंगला नारळ दिन
२ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिनानिमित्त नारळ लागवडीचे महत्त्व पटवून देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी नारळापासून बनवलेले मोदक, पातोळ्या, खीर, चिक्की, वडी यांसह चॉकलेट, आंबा व वेलची फ्लेवरच्या लाडवांचा अस्वाद उपस्थितांनी घेतला.
​तसेच कु. पूर्वा कुरूळकर हिने ‘लखी बाग’ मॉडेलची माहिती दिली. प्रदर्शन फलकांद्वारे गंगा बोंडम, प्रताप, ग्रीन ड्वार्फ, ऑरेंज ड्वार्फ, यलो ड्वार्फ, बाणावली आणि चौघात/कोलंबस या नारळाच्या प्रमुख प्रजातींचे आयुष्यमान, पीक काळ आणि पाण्याचे प्रमाण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदल्या दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कोकेडामाचे प्रदर्शनही येथे भरवण्यात आले होते.
​मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन
या कार्यक्रमास सोवेलीचे सरपंच व ‘मृद्गंध’ ग्रुपचे संपर्क शेतकरी श्री. जयेश मानकर, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी आणि २५ ते ३० ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच व मुख्याध्यापकांनी मृद्गंध ग्रुपच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
​सदर कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजयकुमार देसाई तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!