Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

कोकणस्थ कुंभार समाज युवा कलामंच (पुणे ) यांनी सादर केला कला अविष्कार : मान्यवरांची मने जिकंली

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
कोकणस्थ कुंभार समाज पिंपरी चिंचवड पुणे संस्थेचा कौटुंबिक स्नेहमेळावा १५ ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली,त्यांनतर संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करण्यात आले.त्यानंतर संस्थेचे खजिनदार श्री किरण पवार यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.
समाजासाठी आजवर दिलेल्या योगदानाबद्दल श्री शंकर धारू साळवी यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री सत्यवान साळवी,युवा अध्यक्ष श्री सुहास शिरकर,महिला अध्यक्षा सौ रेश्माताई साळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्वांच्या प्रेमळ उपस्थितीने,उत्स्फूर्त सहभागाने आणि मोलाच्या सहकार्याने कौटुंबिक स्नेहमेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा अत्यंत आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री सतिशदादा दरेकर साहेब,श्री सुभासराव गुडेकर साहेब,श्री प्रकाशशेठ साळवी साहेब,श्री प्रकाश महाराज निवळकर साहेब श्री महेशजी पडवेकर,श्री नाना पालकर,श्री उमेशजी खैर,पं.स.सदस्या सौ उर्वी उमेश खैर,नगरसेवक श्री पंढरीनाथ मायशेट्ये इत्यादी मान्यवरांनीतशेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
श्री विजय निवळकर, आणि कोकणस्थ कुंभार समाज युवा मंच दिग्दर्शित कोकणची नमनकला हा दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपली झलक दाखवून उपस्थितांची मने जिंकली,कृष्णा भूमिकेतील कुमारी अन्वी मंगेश साळवी व कंस श्री सारंग पालकर यांच्या अभिनयाने सर्वांना खिळवून ठेवले होते.अविनाश बागावडे, मंगेश साळवी, रेश्मा साळवी,मान्यता साळवी, पूजा निवळकर, करुणा निवळकर, कांचन साळवी, सौ गुढेकर वहिनी यांच्या टीम ने वासुदेव चे गीत आणि पौराणिक परंपरेचे सुंदर सादरीकरण केले,सुचिता पवार आणि टीम ने उत्कृष्ट कोळीडान्स सादरीकरण केले तशेच कुमारी ओवी प्रमोद देविलकर हिच्या हिरकणी च्या सादरीकरण ने देखील प्रेक्षकांची मने जिंकली. युवा शाहीर प्रितेश राऊत आणि ढोलकीपट्टू प्रतिक साळवी यांच्या कलेला प्रेक्षकानी विशेष दाद दिली आणि कौतुक केले.सोनाली साळवी आणि सहकारी यांनी गणेश वंदन गीत वरती नृत्य सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई साळवी यांच्या भाषणाने कार्यकाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!