Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

दैनिक चालू वार्ताचा ‘रायझिंग स्टार पुरस्कार २०२६’ पत्रकार स्वाती हडकर यांना प्रदान

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

चिपळूण | प्रतिनिधी
पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक चालू वार्ता परिवारातर्फे पत्रकार स्वाती हडकर यांना ‘रायझिंग स्टार पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
समाजातील विविध प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणे, स्थानिक घडामोडी अचूक, वस्तुनिष्ठ आणि प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच समाजहित जपत सातत्याने केलेल्या उल्लेखनीय पत्रकारितेची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला.
या सन्मानामुळे स्वाती हडकर यांच्या पत्रकारितेच्या कार्याचा गौरव झाला असून, भविष्यातही अधिक जोमाने, निष्पक्षपातीपणे आणि समाजहिताची भूमिका जपत कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दैनिक चालू वार्ता परिवारातर्फे प्रदान करण्यात आलेला “रायझिंग स्टार पुरस्कार २०२६” हा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!